विठ्ठलाचे दागिने गहाळ प्रकरणी चौकशी समिती स्थापन

January 29, 2013 12:04 PM0 commentsViews: 85

29 जानेवारी

पंढरपूरच्या मंदिरातले विठ्ठलाचे काही ऐतिहासिक दागिने गहाळ झाल्याची बातमी आयबीएन लोकमतने दाखवली होती. या बातमीची घेऊन मंदिर समितीनं चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. बी.पी रोंगे, बाळासाहेब देहूकर आणि महावीर गांधी हे समितीचे सदस्य आहेत. ही समिती आठ दिवसांमध्ये अहवाल सादर करणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दागिन्यांच्या प्राचीन खजिना आहे. देवांचे सर्व अलंकार या खजिन्यात ठेवले जातात. या खजिन्यातील अलंकार गहाळ झाल्याचा अहवाल विधी आणि न्याय खात्याच्या तपासणी पथकानं दिलाय. जवळपास 88 हिरे, माणिक, मोती आणि सोन्याचे दागिने या खजिन्यातून गायब आहेत. एक वर्षापूर्वी दिलेला हा अहवाल मंदिर समितीनं गुडाळून ठेवला आहे. यात नेमकी काय गोम आहे, कोणाकोणाचा हाता आहे याचा शोध आता सुरू झाला आहे.

close