माहीमच्या झोपडपट्टीत अग्नितांडव, 6 जणांचा मृत्यू

January 25, 2013 9:36 AM0 commentsViews: 6

25 जानेवारी

मुंबईतील माहीममध्ये नवीबस्ती भागात झोपडपट्टीला लागलेल्या आगीत 6 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय. तर 14 जण जखमी झाले आहेत. गुरूवारी रात्री लाकडांच्या गोदामाला लागलेली आग जवळच्या झोपडपट्टीत पसरली. त्यामुळे 50 झोपड्या जळून खाक झाल्या, या आगीत होरपळेलल्या 6 जणांचा भाभा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय. अग्निशमन दलाच्या दहा गाड्‌या घटनास्थळी लगेच दाखल झाल्या होत्या पण रस्ते अरुंद असल्यानं आग विझवण्यात अडथळे आले. अखेर पहाटे या अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश झालंय.

close