विनयभंग प्रकरणी मच्छिंद्र चाटेंना अटक आणि जामीन

January 31, 2013 1:55 PM0 commentsViews: 19

31 जानेवारी

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग केल्याप्रकरणी चाटे कोचिंग क्लासेसचे संचालक मच्छिंद्र चाटे यांना विनयभंग प्रकरणी अटक करण्यात आली आणि जामीन देण्यात आला. 17 वर्षांच्या मुलीचा विनयभंग आणि शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मुंबईतील दादर येथील चाटे कोचिंग क्लासेसची एक शाखा बंद पडली. ऐन परिक्षेच्या तोंडावर शाखा बंद पडल्यामुळे पालकांना एकच धक्का बसला. यासाठी चाटे यांनी एक बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. सदरील पीडित तरूणींने चाटे यांना जाब विचारला. मात्र चाटे यांनी उलट या तरूणीला शिवीगाळ केली आणि तिचा विनयभंग केली. बुधवारी रात्री पीडित तरूणींच्या पालकांनी भोईवाडा पोलीस स्टेशनमध्ये चाटेंच्याविरोधात तक्रार दाखल केली. आज गुरूवारी संध्याकाळी पोलिसांनी चाटे यांना चौकशीसाठी बोलावले असता चौकशीनंतर अटक केली. मात्र काही तासानंतर 15 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला.

close