भटकळसह 10 अतिरेक्यांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

March 5, 2013 4:52 PM0 commentsViews: 9

05 मार्च

हैदराबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या रियाझ भटकळविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. हैदराबाद बॉम्बस्फोटांप्रकरणी विशेष एनआयए (NIA) कोर्टाने आज हे वॉरंट बजावलं. रियाझसह इंडियन मुजाहिद्दीनच्या इतर 9 संशयित अतिरेक्यांविरोधातही वॉरंट जारी करण्यात आले आहे. तसंच संशयित अतिरेकी ओबैदचीही चौकशी NIA करणार आहे. बंगळुरू तुरुंगात असलेल्या ओबैदचा ताबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, स्फोटांप्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आलीय. राष्ट्रीय सुरक्षा गार्ड म्हणजेच NSG च्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने पाकिस्तानातल्या एका अज्ञात माणसाशी फोनवरून बातचीत केल्यामुळे त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या अज्ञात पाकिस्तानी माणसाला हैदराबाद स्फोटांच्या तपासाची माहिती हवी होती. पण, त्याला कुठलीही महत्त्वाची माहिती मिळालेली नाही असं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. तो पाकिस्तानी नागरिक कोण आहे, याचा शोध घेणं सुरू आहे.

close