‘यूपीएससी’त प्रादेशिक भाषेसाठी युतीचा आंदोलनाचा इशारा

March 7, 2013 5:14 PM0 commentsViews: 18

07 मार्च

यूपीएससीच्या मुख्य परीक्षेतला प्रादेशिक भाषेचा पेपर वगळण्याच्या निर्णयावरून वाद सुरू झाला आहे. भाजप आणि शिवसेनेनं या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. प्रादेशिक भाषांकडे दुर्लक्ष करता येणार नाही असं भाजपनं म्हटलं आहे. सरकारने हा निर्णय रेटला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजप आणि शिवसेनेने दिला आहे. मुख्य परीक्षेत दोन ऐवजी एकच वैकल्पिक विषय असणार आहे. मुख्य परीक्षेसाठी पात्रता परीक्षा म्हणून असणारा प्रादेशिक भाषेचा पेपर वगळण्यात आलाय. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.

close