अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी 3 संशयित अटकेत

February 20, 2013 10:25 AM0 commentsViews: 25

20 फेब्रुवारी

भंडारा जिल्ह्यात एकाच घरातल्या 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घडना घडली. याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. तसेच ही घटना घडून 6 दिवस होत आले तरी ठोस कारवाई होत नसल्याने याविरोधात भाजपने 'भंडारा बंद' पुकारण्यात आला. या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. लाखमी तालुक्यातल्या मुरमाड गावातल्या तीन बहिणी 14 फेब्रुवारीला बेपत्ता झाल्या होत्या. दोन दिवसांनंतर म्हणजेच 16 फेब्रुवारीला गावातल्या एका विहिरीत या तिघींचे मृतदेह सापडले. या तिघींवरही बलात्कार झाल्याचे पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि आरोपींना फाशी व्हावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे.

close