प्रक्षोभक भाषण प्रकरणी प्रवीण तोगडियांविरोधात FIR

February 7, 2013 3:02 PM0 commentsViews: 68

07 फेब्रुवारी

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी विहिंप नेते प्रवीण तोगडिया यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तोगडियांविरोधात 153(2) आणि 505 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या न्याय आणि विधि विभागाने तोगडिया यांचं भाषण प्रक्षोभक असल्याचं सांगितलंय आणि त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचा गृहखात्याला सल्ला दिला आहे. तोगडियांनी नांदेड जिल्ह्यातील 22 जानेवारीला भोकर इथं प्रक्षोभक भाषण केलं होतं. तोगडिया यांनी एमआईएमचे आमदार अकबरूद्दीन ओवेसी आणि दोन समाजात दुही निर्माण करणारे भाषणं केलं होतं. याच प्रकरणी आता महाराष्ट्र सरकार प्रविण तोगडीयांविरूध्द कारवाई करत आहे. याप्रकरणी सरकार कारवाई करणार असल्याचं गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केलंय.

प्रक्षोभक भाषणांप्रकरणी यापूर्वी कुणाकुणाला अटक झाली ?

- बाळासाहेब ठाकरे – जुलै 2000('सामना' या मुखपत्रात प्रक्षोभक लेख लिहल्याप्रकरणी अटक)

- प्रवीण तोगडिया – सप्टेंबर 2004(2003 मध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अटक)

- बाळासाहेब ठाकरे – सप्टेंबर 2007(जून 2006: शिवसेनेच्या सभेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अटक)

- राज ठाकरे – फेब्रुवारी 2008(उत्तर भारतीयांविरोधात मोहीम उघडल्यानं अटक)

- वरूण गांधी – मार्च 2009(2009च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात प्रक्षोभक भाषण)

- अकबरुद्दीन ओवेसी – जानेवारी 2013(हिंदुंविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अटक)

close