काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधी उद्या पालघरमध्ये

February 5, 2013 4:14 PM0 commentsViews: 15

05 फेब्रुवारी

एकीकडे नंदूरबारमध्ये कुपोषणामुळे बालमृत्यूचं प्रमाण वाढतंय. तर दुसरीकडे उद्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते पालघरमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. बालकांचा मृत्यूदर आणि कुपोषण कमी करण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे आहे. राज्यात एकूण 1 हजार 130 स्वतंत्र तपासणी पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे. या योजनेमुळे 1 लाख 46 हजार अंगणवाडी केंद्रातील 77 लाख 52 हजार बालकांना लाभ होणार आहे. पालघरच्या जीवन विकास शाळेच्या पटांगणात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी गोठणपूरसह पालघर शहराची साफसफाई, रंगरंगोटी, रस्त्यांची डागडुजी पूर्ण झाली आहे. या योजनेद्वारे प्रत्येक तालुक्यासाठी 3 स्वतंत्र पथकं नेमण्यात येणार आहेत. एका आरोग्य पथकात रुग्णवाहिकेसह एक पुरुष आणि एक स्त्री डॉक्टर, एक नर्स आणि एक फार्मसिस्ट असणार आहेत.

close