हैदराबाद टेस्टवर भारताची मजबूत पकड

March 4, 2013 11:02 AM0 commentsViews: 5

04 मार्च

हैदराबाद टेस्टवर भारतान मजबूत पकड मिळवली आहे. चेतेश्‍वर पुजाराची डबल सेंच्युरी आणि मुरली विजयच्या दीडशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या इनिंगमध्ये 503 रन्सचा भक्कम स्कोर उभा केला. आणि पहिल्या इनिंगमध्ये 266 रन्सची आघाडी घेतली. याला उत्तर देताना दुसर्‍या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाची 2 विकेटवर 74 रन्स अशी अवस्था झाली आहे. आर अश्विननं ऑस्ट्रेलियाला सलग दोन धक्के दिले. ओपनिंगला आलेल्या डेव्हिड वॉर्नरला त्यानं क्लिन बोल्ड केलं. तर फिलीप ह्युजेसला त्यानं भोपळाही फोडू दिला नाही. ऑस्ट्रेलियन टीम आणखी 192 रन्सनं पिछाडीवर आहे. मॅचचे आणखी दोन दिवस बाकी असून भारताचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. त्याआधी दुसर्‍या दिवसअखेर 1 विकेटवर 311 रन्सवर खेळणार्‍या भारतानं आज आणखी 192 रन्सची भर घातली. चेतेश्‍वर पुजारानं आपल्या टेस्ट कारकिर्दीतली दुसरी डबल सेंच्युरी ठोकली. तर मुरली विजयनंही 167 रन्स केले. मुरली विजयची ही टेस्ट कारकीर्दीतली दुसरी सेंच्युरी ठरली.

हैदराबाद टेस्टच्या तिसर्‍या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलं ते चेतेश्‍वर पुजाराची डबल सेंच्युरी. पुजारानं 204 रन्सची दमदार खेळी केली. फक्त 11 टेस्टमधली ही त्याची दुसरी डबल सेंच्युरी ठरली. तर आपल्या टेस्ट कारकिर्दीतली ही त्याची चौथी सेंच्युरी ठरली. क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये चेतेश्वर रन मशीन ठरला. त्याच्या या प्रवासात काही चढउतार आलेही.. पण 25 वर्षाच्या पुजारानं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यावर मात केलीये… भारतीय टीममध्ये त्याची वर्णी लागली त्याआधी त्याची आईनं जगाचा निरोप घेतला. हे दुःख कमी की काय, त्याच्या वडिलांनाही हार्ट ऍटॅक आला. तर चेतेश्वरच्या गुडघ्यावरही शस्त्रक्रिया करावी लागली. पण या अडचणींनी तो डगमगला नाही. अथक परिश्रमांनी तो आपल्या ध्येय्याचा पाठलाग करतंच राहिला. आणि आज पुजारानं हे यश संपादन केलंय.

close