बजेट अधिवेशनात विरोधकांमध्येच जुंपली

March 11, 2013 12:38 PM0 commentsViews: 5

11 मार्च

अधिवेशन सुरू झालं की सत्ताधार्‍यांना भीती असते विरोधकांच्या हल्ल्यांची. पण यावेळी मुख्य विरोधीपक्ष असलेला भाजप आणि मनसेमध्येच जुंपल्याने सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र निर्धास्त आहेत. राज ठाकरेंनी विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसेंवर सेटलमेंटचा आरोप केल्यानं वादाला तोंड फुटलं. तर राज ठाकरेच सुपारी घेऊन आरोप करतात असं प्रत्युत्तर एकनाथ खडसेंनी दिलं. आता राज ठाकरेंनी खडसेंविरोधातले पुरावे देण्याचं जाहीर केलंय. दुष्काळ, सिंचनातल्या भ्रष्टाचाराची चौकशी, भंडारा बलात्कार प्रकरण असा दारूगोळा असताना विरोधकचं भांडणात गुंतल्यानं आशर्चय व्यक्त करण्यात येतेय. त्याचाच प्रत्यय आज अधिवेशन सुरू होण्यापूर्वीही आला. विधानभवन परिसरात शिवसेना-भाजपच्या आमदारांनी दुष्काळाच्या मुद्यावर आंदोलन केलं तर दुसरीकडे मसनेच्या आमदारांनी यूपीएससीच्या धोरणाविरोधात राज्यपालांची गाडी अडवली. त्यामुळे पहिल्याच दिवशी विरोधकमध्ये फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे.

close