औरंगाबादमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार,4 अटकेत

January 25, 2013 9:49 AM0 commentsViews: 17

25 जानेवारी

दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या बातम्यांची शाई वाळत नाही तोच औरंगाबाद शहरातील बायजीपुरा भागामध्ये 23 वर्षीय तरुणींवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. रात्री उशीरा ही घटना घडलीय. हा प्रकार लोकांच्या लक्षात आल्यानंतर जमावानं बलात्कार करणार्‍यांना चोपून काढून पोलिसांच्या हवाली केलंय. धक्कादायक बाब म्हणजे यात 2009 मध्ये घडलेल्या मानसी देशपांडे हत्याकांड प्रकरणात निर्दोष ठरलेला आरोपी राम बोडखेचा समावेश आहे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी 4 जणांना अटक केलीय. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका स्थानिक पदाधिकार्‍याचाही समावेश आहे. प्रतीक चंचलानी असं त्याचं नाव आहे. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

close