उपोषणाला बसलेल्या सफाई कामगाराचा मृत्यू

January 31, 2013 2:04 PM0 commentsViews: 26

31 जानेवारी

धुळ्यात आमरण उपोषणाला बसलेल्या महापालिकेच्या एका बदली सफाई कामगाराचा मृत्यू झाला आहे. रामदास मोरे असं या सफाई कामगाराचं नाव आहे. नोकरीत कायमस्वरूपी करून घेण्याच्या मागणीसाठी धुळे महापालिकेतले सफाई कामगार 15 ते 25 जानेवारीदरम्यान उपोषणाला बसले होते. त्यांना कायमस्वरुपी करण्याचं आश्वासन पालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागेही घेण्यात आलं होतं. पण उपोषणादरम्यान रामचंद्र मोरे यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच आज त्यांचा मृत्यू झाला.

close