नाना पाटेकर यांना पोलीस संरक्षण द्यावं -राम कदम

March 5, 2013 4:59 PM0 commentsViews: 18

05 मार्च

जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी मनसेचे आमदार राम कदम यांनी केली आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर आधारीत 'द अटॅक ऑफ 26/11' या सिनेमात त्यांनी पोलीस अधिकार्‍याची भुमिका केली आहे. त्यामुळे त्यांना दहशतवाद्यांकडून धोका असल्याची भीती राम कदम यांनी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी नाना पाटेकर यांना पोलीस संरक्षण देण्यात यावं म्हणून एक निवेदन मुंबई पोलीस आयुक्त डॉ.सिंग यांना दिले आहे. मात्र नानांनी अजून तरी कोणतीही अशी मागणी केली नाही.

close