अर्थसंकल्प :महिलांचे हात केले बळकट

February 28, 2013 1:54 PM0 commentsViews: 32

28 फेब्रुवारी

महिलांसाठी स्वतंत्र बँक, सुरक्षेसाठी 'निर्भया फंड', बचतगटातील महिलांसाठी समुहविमा अशा अनेक घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहे. केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी आज 2013-14 चा अर्थसंकल्प सादर केला. निवडणुकांच्या तोंडावर सादर झालेल्या बजेटमध्ये 'सबकुछ ठिकठाक' असंच राहिलं आहे. दिल्लीत झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटले होते. न्यायाच्या मागणीसाठी तरूणाईने थेट सत्तेच्या दारावर धडक मारली होती. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे केंद्र सरकारने महिलांची नाराजी दूर करण्यासाठी बजेटमध्ये विशेष घोषणा केल्या आहे.

महिलांसाठी या बजेटमध्ये काय आहे- महिलांसाठी ऑक्टोबरपर्यंत स्वतंत्र बँक स्थापन केली जाणार- सरकार देणार एक हजार कोटी रुपये- बँकेचे कर्मचारी, सभासद आणि ग्राहक महिलाच असणार- महिलांच्या सुरक्षेसाठी एक हजार कोटींचा निर्भया फंड उभारणार- बचतगटातल्या महिलांसाठी समूहविम्याचाही प्रस्ताव

close