कोल्हापूरात भरदिवसा अशोक पाटील यांची हत्या

February 13, 2013 10:28 AM0 commentsViews: 20

13 फेब्रुवारी 2013

कोल्हापूर – कोल्हापूरात आज भर दिवसा अशोक पाटील यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अशोक पाटील हे काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडीक यांचे समर्थक आहेत. पद्माराजे हायस्कूलजवळ अज्ञात युवकांनी अशोक पाटील यांच्यावर गोळीबार केला आणि हल्लेखोर फरार झाले. या हल्ल्यात पाटील यांना तीन गोळ्या लागल्या. त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पाचगावच्या राजकीय वादातून ही हत्या झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. या घटनेमुळं कोल्हापूरात तणाव निर्माण झालाय.

close