इराणी चषक : मुंबई दुसर्‍या दिवशी 2 विकेट 155 रन्स

February 7, 2013 4:29 PM0 commentsViews: 12

07 फेब्रुवारी

रणजी विजेत्या मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया टीमदरम्यान इराणी कप क्रिकेट स्पर्धा खेळवली जात आहेत. पहिली बॅटिंग करणार्‍या रेस्ट ऑफ इंडियाची इनिंग 526 रन्सवर ऑलआऊट झाली. मुरली विजयपाठोपाठ आज दुसर्‍या दिवशी सुरेश रैनानं सेंच्युरी झळकावली. रैना 134 रन्सवर आऊट झाला. याला उत्तर देताना मुंबईची सुरुवात खराब झाली. ओपनिंगला आलेला आदित्य तरे 6 रन्स करुन आऊट झाला. पण यानंतर वासिम जाफर आणि अजिंक्य रहाणेनं मुंबईची इनिंग सावरली. या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी 132 रन्सची पार्टनरशिप केली. पण यानंतर जाफर 80 रन्स करुन आऊट झाला. दुसर्‍या दिवसअखेर मुंबईनं 2 विकेट गमवात 155 रन्स केले.

close