रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपात केली

December 6, 2008 12:40 PM0 commentsViews: 6

6 डिसेंबर मुंबईअर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं बूस्टर पॅकेज जाहीर केलं आहे. बँकांसाठीचे व्याजदर असणा-या रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये 1% कपात केली. रेपो रेट आता 6.5 टक्के असेल तर रिव्हर्स रेपो रेट असेल 5%. महागाई अपेक्षेपेक्षा लवकर कमी होईल आणि हा महागाईचा दर 7%च्याही खाली येईल असा अंदाज आरबीआयचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी व्यक्त केला आहे. आरबीआयच्या या दर कपातीनंतर आता बँकांनीही व्याजदर कमी करावेत अशा सूचना आऱबीआयने केल्या आहेत.

close