ढाक्यात राष्ट्रपतींच्या हॉटेलबाहेर बॉम्बस्फोट

March 4, 2013 11:08 AM0 commentsViews: 6

04 मार्च

बांग्लादेश : ढाक्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हॉटेलबाहेर किरकोळ स्फोट झालाय. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालेलं नाही. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी तीन दिवसांच्या बांग्लादेश दौर्‍यावर आहेत. ढाक्यातल्या सोनारगाव हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. स्फोट झाला त्यावेळी राष्ट्रपती हॉटेलमध्ये होते. ढाका विद्यापीठीच्या पदवीदान समारंभाला राष्ट्रपतींना आज सकाळी हजेरी लावली. त्यानंतर धनमंढीमध्ये श्ख मुजीदबर रहमान यांच्या घराला भेट दिली. दुपारी दोन वाजता ते हॉटेलमध्ये परतले. त्यानंतर 15 ते 29 मिनिटांनी क्रूड बॉम्बचा स्फोट झाला. राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्यानंतर प्रणव मुखर्जी यांचा बांग्लादेशचा हा पहिला दौरा आहे.

close