राजनाथ सिंह नवे भाजपाध्यक्ष

January 23, 2013 8:49 AM0 commentsViews: 10

23 जानेवारी

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आता राजनाथ सिंह यांची बिनविरोध निवड झाली आहेत. राजनाथ सिंह यांच्या विरोधात कोणीही उमेदवारी अर्ज भरला नाही. त्यामुळे राजनाथ सिंह यांच्या नावाची भाजपचे नवे अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली. त्याअगोदर झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत नितीन गडकरींनी राजनाथ सिंह यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर बैठकीत या नावावर एकमत झालं. आपल्या माध्यमातून भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यामुळे आपलं निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत पक्षाध्यक्षपद स्वीकारणार नाही असं नितीन गडकरींनी यावेळी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. तर अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारताच राजनाथ सिंह यांनी काँग्रेसवर थेट हल्ला केला. देशावरील सर्व संकटांना काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. तर सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याच्या निषेध करत उद्या त्याविरोधात आंदोलन करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. याचवेळी अडवाणींनी आता 2014 च्या निवडणुकांची जबाबदारी राजनाथ सिंह यांची असल्याचं सांगत गडकरींच्या कामाचंही कौतुक केलं.

राजनाथ सिंग यांच्या कारकीर्द- 2005 ते 2009 भाजपचे अध्यक्ष – 2004 मधील पराभवानंतर अडवाणींच्या जागी अध्यक्षपदी नियुक्ती- 2000 ते 2002- उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री- 1964 पासून आरएसएसशी संबंध- NDA सरकारमध्ये कृषीमंत्री

अध्यक्षपदाच्या काळातील यश : — अध्यक्षपदाच्या कार्यकाळात 2007मध्ये भाजपने पंजाब आणि उत्तराखंड मध्ये मिळवलं यश- 2008मध्ये भाजपची पहिल्यांदा कर्नाटकामध्ये सत्तेवर- 2008मध्ये मध्यप्रदेश तसंच छत्तीसगढमध्ये घवघवीत यश

close