भुजबळांविरोधात सोमय्यांची ‘ईडी’कडे तक्रार दाखल

February 5, 2013 4:27 PM0 commentsViews: 10

05 फेब्रुवारी

सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी एन्फोर्समेंट डिरेक्टोरेटकडे तक्रार दाखल केली आहे. सोमय्यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर आरोप केले आहे. छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांचे हवाला घोटाळ्यातला आरोपी अनिल बस्तावडे याच्याशी आर्थिक संबंध आहेत. या अनिल बस्तावडेबरोबर समीर भुजबळ यांच्या जकार्तामध्ये बैठका झाल्या. भुजबळ कुटुंबीयांनी बस्तावडेमार्फत कोळसा खाणीत मोठी गुंतवणूक केली, असा आरोप सोमय्यांनी केला आहे. याप्रकरणी सोमय्या यांनी आज ईडीकडे तक्रार केली.

close