पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 12 मुली आणि 5 एजंटना अटक

January 29, 2013 2:43 PM0 commentsViews: 177

29 जानेवारी

पुण्यातील उच्चभ्रू वसाहतीत वेश्या व्यवसाय करणार्‍या 12 मुली आणि 5 एजंटना पोलिसांनी धाड टाकून अटक केली आहे. कोरेगांवपार्क भागातील गोल्ड फिल्ड प्लाझा सोसायटीमधील फ्लॅटमध्ये बर्‍याच दिवसांपासून हा वेश्या व्यवसाय करण्यात येतो अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागानं या फ्लॅटवर धाड टाकून ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या मुलींमध्ये एक उजबेकीस्तान, एक बांगलादेशी आणि एका नेपाळी मुलीचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या मुली आणि एजंटवर पिटा ऍक्टअंर्तगत कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या मुलींना आणि एजंटला आज पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणातील एजंटला 31 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

close