जालन्याला रेल्वेने पाणी देणार -अजित पवार

January 31, 2013 2:13 PM0 commentsViews: 26

31 जानेवारी

दुष्काळग्रस्त जालना जिल्ह्याला बुलडाण्यातून, तर बीडला कुकडीचं पाणी रेल्वेनं देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्यासाठी 1064 कोटी रूपयांच्या विभागीय वार्षिक योजनेला मान्यताही देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांची बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. बुलढाणा जिल्ह्याला जवळच्या धरणातून पाणी देण्यात येईलच पण शेजार धर्म म्हणून जालन्यालाही रेल्वे, टँकरने पाणी देण्यात येईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

close