दुष्काळावर मात करण्यासाठी 5 हजार कोटींची तरतूद

February 28, 2013 2:17 PM0 commentsViews: 36

28 फेब्रुवारी

यूपीए सरकारने शेवटच्या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. कृषीमंत्रालयासाठी 27 हजार 49 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर बनली आहे. दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी पाच हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसंच शेतकर्‍यांना कर्जासाठी 7 लाख कोटी रूपये तरतूद केले आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांना खासगी बँकांचे दार मोकळे केले आहे. आता खासगी बँकांतून शेतकर्‍यांना 4 टक्के व्याजावर कर्ज मिळणार आहे. पीक कर्जावरील व्याजात सवलत कायम ठेवली आहे.

बजेटमध्ये शेतकर्‍यांना काय मिळालंय

- कृषीमंत्रालयासाठी 27 हजार 49 कोटी- शेती कर्जासाठी 7 लाख कोटी रुपये- खाजगी बँकांतून शेतकर्‍यांना 4 टक्के व्याजावर कर्ज घेता येणार- पीक कर्जावरील व्याजात सवलत कायम राहणार- छोट्या शेतकर्‍यांसाठी 100 कोटींचा क्रेडीट फंड- कोल्डस्टोरेज आणि गोडाऊन बांधण्यासाठी नाबार्डला पाच हजार कोटी- दुष्काळावर मात करण्यासाठी 5 हजार कोटींची तरतूद- कृषी क्षेत्राच्या मदतीसाठी नाबार्डला 5 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे

close