सांगलीचे महापौर नायकवडींच्या घरावर आयकर विभागाचा छापा

February 20, 2013 12:22 PM0 commentsViews: 23

20 फेब्रुवारी

राज्यात गंभीर दुष्काळ परिस्थिती असताना राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आपल्या आयोजित केलेले मुलामुलीचे शाही लग्न चांगलेच महागात पडले. मंगळवारी इन्कम टॅक्स विभागाने जाधव यांच्या घरावर छापा टाकला होता आता त्यांच्या पाठोपाठ सांगलीचे महापौर इदि्रस नायकवडी यांच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकला. 17 फेब्रुवारीला सांगलीचे महापौर इदि्रस नायकवडी यांच्या मुलाचे शाही लग्न झाले होते. या लग्नावर महापौरांनी लाखो रूपयांचा चुराडा केला होता. याबाबत मीडियाने आवाज उठवल्यानंतर आज आयकर विभागाला त्याची दखल घ्यावी लागली. आज दुपारी 3 च्या सुमारास नायकवडी यांच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकला. या छाप्यात आयकर अधिकार्‍यांनी नायकवडी यांच्या मुलाच्या शाही लग्नाच्या खर्चाची चौकशी केली. तब्बल 1 तास आठ अधिकार्‍यांकडून महापौरांच्या घरात चौकशी सुरू होती. या छाप्याची बातमी समजताच महापौरांच्या घरासमोर गर्दी जमली. आयकर अधिकार्‍यांनी घराचे दरवाजे बंद करून महापौरांच्या शाही सोहळ्याची गुप्तपणे माहिती घेतली. यावेळी महापौरांचा मुलगा अतहर आणि काही कुटुंबीय उपस्थित होते. महापालिकेच्या महासभा असल्याने महापौर नायकवडी या ठिकाणी पोहचू शकले नाहीत.

close