33 वर्षानंतर राहुल आवरेनं मिळवून दिलं गोल्ड मेडल

December 6, 2008 1:05 PM0 commentsViews: 10

6 डिसेंबर महाराष्ट्राच्या राहुल आवरेनं इतिहास घडवलाय.राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तब्बल 33 वर्षानंतर त्यानं महाराष्ट्राला फ्रीस्टाईलमध्ये गोल्ड मेडल जिंकून दिलं आहे. पुण्यात नुकत्याच झालेल्या युवा राष्टकुल क्रीडा स्पर्धेतही राहुल अनावरेनं भारताला गोल्ड मेडल जिंकून दिलं होत.अयोध्येत झालेल्या सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राहुलनं 55 किलो वजनी गटात गोल्ड मेडल जिंकलं. त्यानं हरयानाच्या विनोद कुमारची कडवी झुंज मोडीत काढली. याच स्पर्धेत ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल जिंकणा-या सुशील कुमारनंही 66 किलो वजनी गटात गोल्ड मेडल जिंकलं.

close