तामिळनाडूत ‘विश्वरूपम’ हाऊसफुल्लम्

February 7, 2013 4:38 PM0 commentsViews: 2

07 फेब्रुवारी

अनेक वादात अडकलेला अभिनेता कमल हासनचा 'विश्वरूपम' सिनेमा अखेरीस तामिळनाडूत रिलीज झाला आहे. कमल हासनच्या चाहत्यांनी मोठ्या धुमधडाक्यात उत्साह साजरा केला. 600 चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित झालाय. विशेष म्हणजे जवळपास सर्व चित्रपटगृहांमध्ये सिनेमा हाऊसफुल्ल आहे. काही चित्रपटगृहांमध्ये पहाटे पाच वाजताचे शो ठेवण्यात आले आहे. आणि ते ही फूल झाले आहेत. तर 13 फेब्रुवारीपर्यंतचे सगळे शो हाऊसफूल्ल आहेत. विश्वरूम अगोदर मुंबईसह देशभरात रिलीज झाला. देशभरात विश्वरूपमला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र तामिळनाडूत रिलीज होताच सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले आहे.

close