बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्काराची टांगती तलवार

March 11, 2013 3:20 PM0 commentsViews: 14

11 मार्च

12 वीच्या पेपर तपासणीवर शिक्षकांनी घातलेल्या बहिष्काराला आज 18 दिवस पूर्ण झाले. आज याबाबत ज्युनिअर शिक्षक फेडरेशनची बैठक झाली आणि त्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 19 मार्चला भायखळा ते आझाद मैदान महामोर्चा काढला जाणार आहे. तर नाशिक विभागात शिक्षण उपसंचालकांनी बहिष्कार आंदोलनात सहभागी असलेल्या शिक्षकांचं मार्च महिन्याचं वेतन न देण्याचा आदेश काढलाय. याचा तीव्र निषेधही करण्यात आला. कारण शिक्षक पेपरतपासणी वगळता सर्व कामे करत आहेत अशा वेळी वेतन रोखणं हे सरकारचं बेजबाबदारपणाचं वर्तन आहे असं फेडरेशनचं म्हणणं आहे. निवृत्त शिक्षकांकडून पेपर तपासून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. पण त्याचा फारसा फायदा होणार नसल्याचं सांगण्यात येतंय.

close