दलित अत्याचार प्रकरणी सामाजिक संघटना रस्त्यावर

February 4, 2013 10:10 AM0 commentsViews: 78

04 फेब्रुवारी

कुलकजाई येथे दलित नवविवाहीत दाम्पत्याला मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ टाटा सामाजिक विज्ञान संस्था आणि इतर सामाजिक संघटनांनी सातारा शहरात आज मोर्चा काढला. 22 जानेवारीला कुलकजाईला वैभव घाडगे आणि त्याची पत्नी मोहिनी घाडगे या दोघांना 3 हल्लेखोरांनी बेदम मारहाण करून त्यांना 300 फूट दरीत फेकून दिले होते. पोलिसांनी या प्रकरणी जबरी चोरी आणि विनयभंगचा गुन्हा दाखल केला होता. यावर राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी या घटनेचा तपास क्राईम ब्रांचकडे दिला आहे. या गोष्टीला 5 दिवस होऊन देखील तपास जैसे थे असल्याने आणि अनेक मागण्या घेवून टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

close