चंदगडच्या पोटनिवडणुकीसाठी संध्यादेवी कुपेकरांना उमेदवारी

January 29, 2013 3:27 PM0 commentsViews: 92

29 जानेवारी

कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगडच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आज संध्यादेवी कुपेकर यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. दरम्यान, बाबासाहेब यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर आणि चंदगडचे गोपाळराव पाटील हे दोघेही या जागेसाठी इच्छूक होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांनी संध्यादेवींच्या उमेदवारीची घोषणा केली आहेत. त्यामुळे संग्रामसिंह कुपेकर हे या निवडणुकीत बंड करणार की आपल्या काकींना पाठींबा देऊन राष्ट्रवादी पक्षाला मदत करणार हे पहावं लागणार आहे. येत्या 24 फेब्रुवारीला चंदगडच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

close