विश्व’वाद’म मिटण्याची शक्यता

January 31, 2013 3:03 PM0 commentsViews: 9

31 जानेवारी

गेल्या काही दिवसांपासून वादात अडकलेल्या 'विश्वरुपम' सिनेमाचा मार्ग मोकळा होण्याची चिन्ह आहे. निर्माता कमल हासन आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यात तडजोड होण्याची शक्यता आहेत. आज सकाळी जयललिता यांनी विश्वरुपम चित्रपट प्रदर्शित झाला असता तर हिंसा भडकली असती. त्यामुळे 'विश्वरुपम'वर बंदी घातली असं स्पष्टीकरण दिलं. तसंच चित्रपटातील आक्षेपार्ह दृष्य काढून टाकल्यास चित्रपट प्रदर्शित करता येईल असे संकेतही जयललितांनी दिले.

जयललितांच्या स्पष्टीकरणानंतर कमल हासनने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. आणि जयललिता यांचे आभार मानले. विश्वरूपमच्या बंदीशी जयललिता यांचा संबंध नसल्याचं त्यानी स्पष्ट केलं. बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार नसल्याचंही त्यानी सांगितलं. माझ्या चित्रपटांमुळे मला कोणाचेही मन दुखवायची नाही. मी कोणत्याही धर्माला दुखवू शकत नाही. पण राजकारणामुळे मी नाराज झालो. जर या पुढे माझ्या सिनेमांवर बंदी घातली गेली तर मला देश सोडून जाण्याशिवाय माझ्याकडे पर्याय राहणार नाही असं निराशजनक मत हासनने व्यक्त केलं. बुधवारी मी देश सोडून जाण्याचा इशारा दिला होता पण त्यावेळी अत्यंत नाराज झालो होतो त्यामुळे मला असं बोलावं लागलं असंही हासन यांनी स्पष्ट केलं. तसंच मला ज्यांनी ज्यांनी पाठींबा दिलाय माझे प्रोत्साहन वाढवले अशा सर्वांचे हासन यांनी आभार मानले. हासन यांनी या अगोदरच आक्षेपार्ह दृष्य काढून टाकण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळे वादाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

close