कोल्हापूरमध्ये रिक्षाचालकांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल

March 6, 2013 10:12 AM0 commentsViews: 9

06 मार्च

कोल्हापूरमध्ये रिक्षाचालकांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल होताहेत. संपाचा आज तिसरा दिवस आहे. ई-मीटरची सक्ती रद्द करावी या मागणीसाठी हा बंद पुकारण्यात आला. ई मीटरची किंमत जास्त असल्यानं ते लावणं परवडत नाही असं रिक्षाचालकांचं म्हणणं आहे. तसेच रिक्षाचा संप यशस्वी झाल्याचा दावा संघटनेनं केलाय. या संपामुळे प्रवासी टांग्याचा वापर करत आहेत, तसंच स्थानिक केएमटी आणि एसटीवर भार पडला आहे.

close