पीएफवर मिळणार पाव टक्के ज्यादा व्याजदर

February 25, 2013 5:06 PM0 commentsViews: 15

25 फेब्रुवारी

एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने कोट्यवधी कर्मचार्‍यांना दिलासा दिला आहे. 2012-13 च्या पीएफवर 8.5 टक्के व्याज देण्याचा निर्णय EPFO घेतला आहे. मागिलवर्षी पीएफवर 8.25 टक्के व्याज देण्यात आलं होतं. EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची आज बैठक झाली. त्यात व्याजदरात पाव टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण पीएफवरचा व्याजदर आणखी वाढवण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसनं केली आहे.

close