सोनई हत्याकांड प्रकरणी आणखी दोघांना अटक

February 7, 2013 4:43 PM0 commentsViews: 46

07 फेब्रुवारी

अहमदनगर जिल्ह्यातील सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. गणेश दरंजले, अशोक फालके अशी या आरोपींची नावं आहेत. या दोघांच्या अटकेमुळे एकूण आरोपींची संख्या सात झाली आहे. हत्याकांडानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते अखेरीस आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. दरम्यान या हत्याप्रकणी पीडितांच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यंाची मंत्रालयात भेट घेतली. रोजगार हमी योजनेचे मंत्री नितीन राऊत यांनी ही भेट घडवून आणली. कुटुंबियांतर्फे यावेळी मुख्यमंत्र्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. या प्रकरणाची सीआयडीमार्फेत चौकशी करण्यात यावी. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा. या प्रकरणाची सुनावणी नगरमध्ये न घेता जळगाव मध्ये व्हावी आणि मृतांच्या पत्नीला नोकरी मिळावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

close