मॅरेडोना कोलकाता भेटीवर

December 6, 2008 8:07 AM0 commentsViews: 6

6 डिसेंबर कोलकाताफुटबॉलचा जादूगार दिएगो मॅरेडोना कोलकाता भेटीवर आला आहे. आणि फुटबॉल क्रेझी असणा-या कोलकातावासियांनीही आपला हिरो आल्याचा आनंद वेगळयाच ढंगात साजरा केला. मॅरेडोनाच्या स्वागतासाठी संपूर्ण कोलकाता शहर सज्ज होतं. शनिवारी पहाटे त्याचं कोलकात्यात आगमन झालं. 1986चा वर्ल्डकप चॅम्पियन मॅराडोनाच्या स्वागताला जवळपास 20,000 पेक्षा जास्त फुटबॉलप्रेमी विमानतळावर उपस्थित होते. तर 5000पेक्षा जास्त सुरक्षा रक्षकही तैनात होते. लोकांनी केलेल्या स्वागतामुळे आपल्याला खूपच आनंद झाला असल्याचं मॅरेडोनाने सांगितलं. आपल्या भारत भेटीत मॅरेडोना कोलकात्यातील एका फुटबॉल अ‍ॅकॅडमीचं उदघाटन करणार आहे. तसंच बंगालमधील मोहन बागान या फुटबॉल क्लबलाही तो भेट देणार आहे.

close