दिल्ली गँगरेप प्रकरणाच्या सुनावणीला सुरूवात

February 5, 2013 4:49 PM0 commentsViews: 5

05 फेब्रुवारी

देशाला हादरवून सोडणार्‍या दिल्ली बलात्कार प्रकरणी सात आठवड्यानंतर सुनावणीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र दिल्ली कोर्टात सादर केले आहे. यामध्ये पोस्टमॉर्टेम रिपोर्टचाही समावेश आहे. गेल्या आठवड्यात कोर्टाने पाच आरोपींविरुद्ध गुन्हे निश्चित केले होते. तर सहावा आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याच्याविरुद्ध जुव्हेलाईन कोर्टात खटला चालणार आहे. याप्रकरणी जवळपास 86 प्रत्यक्षदशीर्ंची तपासणी होणार आहे. यामध्ये त्यावेळी बसमध्ये असणार्‍या बहादूर मुलीच्या मित्राचाही समावेश असणार आहे. एका महिन्यात ही कार्यवाही पूर्ण करू, असा विश्वास वकिलांनी व्यक्त केला आहे.

close