सुशीलकुमार शिंदेंची बेजबाबदार वक्तव्य

February 22, 2013 4:18 PM0 commentsViews: 6

22 फेब्रुवारी

हैदराबाद स्फोटांनंतर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदें वर पुन्हा एकदा टीका होतेय. स्फोटांची माहिती गुप्तचर विभागाने दिली होती अशी माहिती त्यांनी दिली होती. माहिती होती तर स्फोट का रोखता आले नाही, हा सवाल त्यांना विचारण्यात येतोय. गृहमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यावर शिंदेंनी अशी अनेक वादग्रस्त आणि बेजबाबदार विधानं केली आहेत. पाहूया शिंदेंची बेजबाबदार वक्तव्य…

सप्टेंबर 2012 : कोळसा खाण घोटाळा- 'बोफोर्स घोटाळ्याप्रमाणे कोळसा घोटाळाही लोक लवकरच विसरतील' – शिंदे

ऑगस्ट 2012 : खा. जया बच्चनबाबत वक्तव्य- आसममधल्या परिस्थितीविषयी संसदेत चर्चा सुरू असताना त्यांनी जया बच्चन यांना सल्ला. हे काळजीपूर्वक ऐका, हा गंभीर मुद्दा आहे, सिनेमा नाही – शिंदे

डिसेंबर 2012 : दिल्ली बलात्कार प्रकरण- बलात्कारविरोधात आंदोलन करणार्‍यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचं समर्थन, आंदोलकांची तुलना माओवाद्यांशी

जानेवारी 2013 : हिंदू दहशतवाद- भाजप आणि संघाच्या शिबिरांमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात असल्याचं वक्तव्य

फेब्रुवारी 2013 : अफझल गुरूच्या फाशीबाबत- फाशीची माहिती अफझलच्या कुटुंबीयांना वेळेत न दिल्याबद्दल शिंदेंवर टीका

फेब्रुवारी 2013 : हैदराबाद साखळी स्फोट- गुप्तचर विभागाची माहिती असतानाही स्फोट रोखू न शकल्यामुळे टीका

close