हिट अँड रन प्रकरणी सलमान खान आणखी अडचणीत

January 31, 2013 3:23 PM0 commentsViews: 27

31 जानेवारी

2002 च्या हिट अँड रन केसप्रकरणी सलमान खान आता अधिक अडचणीत आलाय. आता अधिक गंभीर आरोपांखाली सलमानवर खटला चालवण्यात येणार आहे. आयपीसीच्या कलम 304 (2) नुसार म्हणजेच सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे. दोषी आढळल्यास त्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. यापूर्वी त्याच्यावर निष्काळजीपणामुळे मृत्युला जबाबदार ठरल्याबद्दल गुन्हा दाखल होता. याप्रकरणी मुंबई मॅजिस्ट्रेट कोर्टानं सलमानला 11 मार्चला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत.

close