दलित महिलेवर अत्याचार प्रकरणी काँग्रेसच्या नगरसेवकांचा पुतण्या फरार

March 1, 2013 9:58 AM0 commentsViews: 48

01 मार्च

भंडार्‍यातल्या प्रकरणावरून केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी नावं जाहीर करून वादाला तोंड फोडले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या नगरसेवकाचा नातलग अहमदनगरमधील एका अत्याचार प्रकरणात फरार आहे. 22 फेब्रुवारीला श्रीरामपूरमध्ये एका दलित महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. त्यात तिला अमानुष मारहाणही करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी 15 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. त्यापैकी 3 महिलांना अटक करण्यात आली. तर 4 आरोपी निष्पन्न झाले आहे. पण ते फरार आहेत. विशेष म्हणजे, यातला फरार आरोपी दानिश शेख हा काँग्रेसचे नगरसेवक मुजफ्फर शेख यांचा पुतण्या आहे. यातल्या आरोपींच्या विरोधात बलात्काराचा प्रयत्न, दंगल भडकवणे आणि दलित अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी 5 पथकं तयार केली आहेत. दरम्यान, आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी श्रीरामपूर बंद करण्यात आलं होतं.

close