नेरूळमध्ये संत साहित्य संमेलन

February 17, 2013 12:13 PM0 commentsViews: 37

17 फेब्रुवारी 2013

नवी मुंबई – नवी मुंबईतल्या नेरूळ इथं दुस•या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संममेलनाला शनिवारपासून सुरूवात झाली. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं. राज्यातील उद्योग, संस्था, समूह यांनी आता पुढाकार घेऊन दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी पाणी, जनावारांसाठी चा•याची सोय करावी यासाठी वारकरी संप्रदायानं प्रयत्न करण्याचं आवाहन शरद पवार यांनी यावेळी केलं. तसंच मानवतेचा संदेश देणा•या वारकरी संप्रदायात महिलांबद्दल दुजाभाव का केला जातोय असा परखड सवालही शरद पवार यांनी संत साहित्याच्या या व्यासपीठावरुन वारकरी संप्रदायाला केला. यावेळी मुलांनी दिंडी काढून हरिनामाचा जयघोष केला. रविवारी विविध चर्चासत्रांमध्ये जोरदार चर्चा रंगली. सोमवारी या साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे.

close