रेल्वे भाड्यात छुपी दरवाढ

February 26, 2013 9:01 AM0 commentsViews: 15

26 फेब्रुवारी

केंद्रीय रेल्वेमंत्री पवन बन्सल यांनी 2013-14 या वर्षाचे रेल्वे बजेट सादर केलं. या बजेटमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना टार्गेट न करता प्रवाशांच्या खिसा कापण्यात आला आहे. रेल्वे प्रवासावर कोणतीही दरवाढ केली नसली तरी इतर छुपे खर्च लादण्यात आले आहे. डिझेल आणि वीजेच्या दरात झालेल्या वाढीमुळे आता रेल्वेचा सुपरफास्ट प्रवास महागला आहे. त्याचबरोबर तात्काळ तिकीट घेणार्‍या प्रवाशांना आता फटका बसणार आहे. तात्काळ तिकीट खरेदी करताना आता जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. तसंच रेल्वेचा प्रवास सुकर व्हावा यासाठी प्रथम आरक्षण केलेलं बरं असा नेहमीचा फंडा आता महागात पडणार आहे. कारण रेल्वेचं आरक्षणही महागलं आहे. यापाठोपाठ मालवाहतूकही 5 टक्क्यांनी महागली आहे. या दरवाढीतून सरकारच्या तिजोरीत फक्त 850 कोटी जास्त जमा होतील असं रेल्वेमंत्री बन्सल यांनी स्पष्ट केलं आहे. भाषणाच्या सुरूवातील बन्सल यांनी मागिल वर्षी 2012-2013 मध्ये रेल्वे खात्याला अंदाजे 24 हजार कोटींचा तोटा झाला. हाच तोटा आता चालू वर्षात 2013 मध्ये 600 कोटीने वाढणार असून तो 24 हजार 600 कोटींवर जाणार असंही बन्सल यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे भाडेवाढीकडे नफ्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं जात नाही तर तोटा भरून काढला जात आहे असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.

छुपी दरवाढ

आरक्षण शुल्क वाढलं- एसी फर्स्ट, एक्झिक्युटिव्ह क्लास – 35 वरून 65 रु.- फर्स्ट क्लास, एसी-2 – 25 वरून 50 रु. – एसी चेअर कार – 25 वरून 40 रु. – एसी-3 इकॉनॉमी क्लास – 25 वरून 40 रु. – एसी-3 टियर – 25 वरून 40 रु. – सुपरफास्ट ट्रेन्स अधिभार – 5 ते 25 रु. दरम्यान वाढतत्काल आरक्षण महागलं- स्लीपर क्लास – 15 वरून 25 रु. – एसी चेअर कार – 25 ते 50 रु.- एसी-3 टियर – 50 रु. वाढ- एसी-2 टियर – 100 रु. वाढ- एक्झिक्युटिव्ह क्लास – 100 रु. वाढ- आरक्षण रद्द चार्ज – 5 ते 25 रु. दरम्यान वाढ

close