सचिनचा आणखी एक ‘फर्स्ट क्लास’रेकॉर्ड

February 8, 2013 10:06 AM0 commentsViews: 9

08 फेब्रुवारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खात्यात आणखी एक रेकॉर्ड जमा झाला आहे. रणजी विजेत्या मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया टीमदरम्यान इराणी कपसाठी मॅच रंगतेय. या मॅचमध्ये मुंबई टीमकडून खेळणार्‍या सचिन तेंडुलकरनं शानदार सेंच्युरी झळकावली. फर्स्ट क्लास क्रिकेटमधली ही त्याची 81वी सेंच्युरी ठरली आहे. याबरोबरच त्यानं लिटील मास्टर सुनील गावसकर यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. शिवाय फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने 25 हजार रन्सचा टप्पाही पार केलाय. 22 फेब्रुवारीपासून होणार्‍या ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजच्या आधी सचिन तेंडुलकर चांगलाच फॉर्मात आला आहे.

सचिन तेंडुलकरच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील कामगिरीवर

मॅच – 303सेंच्युरी – 81बेस्ट – 248*रन्स – 25003

सुनील गावसकरांची कामगिरी

मॅच – 348सेंच्युरी – 81बेस्ट – 340रन्स – 25834

close