हैदराबादमध्ये साईबाबा मंदिर होतं दहशतवाद्यांचं टार्गेट

February 23, 2013 9:43 AM0 commentsViews: 62

23 फेब्रुवारी

हैदराबाद बॉम्बस्फोटाबाबत आता नवीन माहिती पुढे येतेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साईबाब मंदिर हे दहशतवाद्यांचं पहिलं टार्गेट होतं. पण त्यादिवशी मंदिराला पोलीस आयुक्तांनी अचानक भेट दिली. त्यामुळे दहशतवाद्यांनी आपलं टार्गेट बदलल्यांची माहिती सूत्रांनी दिली. ज्या दिवशी बॉम्बस्फोट झाले तेथील सीसीटीव्ही फुटेज जारी करण्यात आले आहे. या फूटेजमध्ये पोलीस कमिशनरसोबत असलेल्या पोलिसांच्या ताफ्यामुळे दहशतवाद्यांनी तिथून काढता पाय घेतला. हे स्पष्ट झालं. आता या सीसीटीव्ही फुटेजच्यानुसार पोलीस पुढील तपास करत आहे. या सीसीटीव्ही फुटेजचा काही थेट संबंध या प्रकरणी नाही पण यातून काही माहिती मिळतेय का यासंदर्भात पोलीस सध्या तपास केला जात आहे.

close