‘राज ठाकरेंच्या आरोपांमागे बिल्डर लॉबी’

March 12, 2013 9:55 AM0 commentsViews: 16

12 मार्च

मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांच्यावर सेटलमेंटचे आरोप केले होते. त्या आरोपांना आज एकनाथ खडसेंनी विधानसभेत उत्तर दिलंय. आपण भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर काढल्यानं बिल्डर लॉबी नाराज झाली आहे. राज ठाकरेंनी केलेल्या आरोपांमागे बिल्डर लॉबी असल्याचा आरोपही खडसेंनी केला. तसंच सेटलमेंटचे पुरावे असतील तर ते सभागृहात सादर करा असं आवाहनी त्यांनी केलं. त्याचबरोबर चौकशीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-मनसे अशी चौकशी समिती नेमण्याचं आवाहनंही एकनाथ खडसेंनी केलं. दरम्यान, 'सेटलमेंट'च्या आरोपामुळे विधिमंडळाचा अपमान झालाय. त्यामुळे या आरोपांची सीआयडी चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

close