महिला वर्ल्ड कपमध्ये भारताची विजयी सलामी

January 31, 2013 4:52 PM0 commentsViews: 4

31 जानेवारी

महिला क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये यजमान भारताने विजयी सलामी दिली आहे. मुंबईतल्या ब्रेबॉर्न स्टेडिअमवर रंगलेल्या मॅचमध्ये भारताने वेस्ट इंडिजचा 105 रन्सनं धुव्वा उडवला. थिरुश कामिनीने केलेल्या सेंच्युरीच्या जोरावर पहिली बॅटिंग करणार्‍या भारताने 6 विकेट गमावत 284 रन्स केले. याला उत्तर देताना वेस्ट इंडिजची टीम अवघ्या 179 रन्सवर ऑलआऊट झाली. झुलन गोस्वामी आणि सुलताना गौहरनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

close