राणे समर्थकांचा राज्यात धुडगूस

December 6, 2008 9:15 AM0 commentsViews: 2

6 डिसेंबर नाशिकमुख्यमंत्रीपदी निवड न झाल्यामुळे राणेंनी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षश्रेष्ठींसह , विलासराव देखमुख आणि अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती. पत्रकार परिषदेत पक्षविरोधी जाहीर वकत्व्य केल्यामुळे नारायण राणेंना पक्षातून निलंबित करण्यात आलं. राणेंच्या निलंबनामुळे त्यांच्या चिडलेल्या समर्थकांनी राज्यात नाशिक, नालासोपारा, बीडमध्ये जोरदार निदर्शन केली. तसेच नाशिक, बीडमध्ये दगडफेकही करण्यात आली. नालासोपारा येथे पुतळा जाळण्यात आला. बीडमध्ये काँग्रेस शहराध्यक्षांच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आली. नाशिकमध्ये राणेसमर्थकांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको करून निदर्शनं केली. निलेश राणे पुरस्कृत स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सीबीएसवर निदर्शनं केली. नाशिकमध्ये विलासराव देशमुखांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केल्यामुळे राणे समर्थकांना पुतळा जाळता आला नाही. पोलिसांना देशमुखांचा पुतळा ताब्यात घेण्यात यश आलं. स्वाभिमानचे उत्तर महाराष्ट्र संघटक रम्मी राजपूत यांनी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष पदाचा त्याग केला.

close