मुंबईकरांना गार’हवा’

February 26, 2013 9:35 AM0 commentsViews: 11

26 फेब्रुवारी

मुंबईची लाईफ लाईन अर्थात ' लोकल रेल्वे'…मुंबईत लोकलने दररोज लाखो लोक प्रवास करतात. महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या नागरीकांच्या रेल्वे बजेटकडून रास्त अपेक्षा असणे साहजिकच होते. पण यंदाच्या रेल्वे बजेटमध्ये फक्त 'गार हवा'च देण्यात आला. घामांच्या धारांनी चिंब भिजलेल्या अवस्थेत लोकलने प्रवास करणार्‍या मंुबईकरांना रेल्वे मंत्री पवन बन्सल यांनी थंडगार दिलासा आहे. येत्या वर्षाभरात लोकलला एसी डब्बे लावण्यात येणार आहे अशी घोषणा बन्सल यांनी केली. त्याचबरोबर लोकलच्या 72 फेर्‍याही वाढवण्यात आल्या आहे. मुंबईत एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कल्याण-कर्जत दरम्यान तिसरा लोहमार्ग टाकण्याचा प्रस्ताव आहे. मात्र यंदाच्या बजेटमध्ये विशेष काही मिळालं नसल्यामुळे मुंबईकरांनी बजेटवर नाराजी व्यक्त केली आहे.बजेटमध्ये मुंबईच्या वाट्याला

- मुंबईत लोकलच्या 72 नव्या फेर्‍या- मुंबईत वर्षभरात लोकलला एसी डबे लागणार- मुंबईत एलिवेटेड रेल्वे कॉरिडॉर- कल्याण-कर्जत दरम्यान तिसरा लोहमार्ग

close