महाराष्ट्रात सत्ता द्या : मायावती

February 17, 2013 12:32 PM0 commentsViews: 16

17 फेब्रुवारी 2013

नागपूर – बहूजन समाज पार्टीच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मायावतींची रविवारी नागपुरच्या कस्तूरचंद पार्क मैदानावर सभा पार पडली. आगामी लोकसभेची तयारी म्हणून या सभेकडे अनेकांचे सगळ्यांचे लक्षं लागले होते. यावेळी बोलतांना मायावती यांनी काँग्रेस आणि युपीएवर कडाडून टीका केली. सरकारी नोक•यांमधील ST/SC आरक्षणच्या केस प्रकरणी केंद्रानं सुप्रीम कोर्टात 2006 मध्ये चांगला वकील न दिल्याने अडचणी वाढल्या असल्याची टीका मायावतींनी केली. काँग्रेस आणि भाजपने मिळून लोकसभेत ST/SC आरक्षण बिल मंजूर होवू दिले नाही असेही मायावती म्हणाल्या. महाराष्ट्रात सत्ता आल्यास दलितांवर अत्याचार करणा•यांना कडक शिक्षा देण्याची तरतुद करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तेलंगाना सोबतच विदर्भालाही स्वतंत्र दर्जा देण्याची मागणीही मायावतींनी केली. तसच महाराष्ट्रात बसपाला सत्ता देण्याचं आवाहनही मायावतींनी केलं.

close