भंडारा बलात्कार,हत्येप्रकरणाला 10 दिवस आरोपी मोकाटच

February 23, 2013 9:52 AM0 commentsViews: 26

23 फेब्रुवारी

भंडारा येथील तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि हत्येच्या घटनेला आज दिवस 10 होत आहे. पण अजूनही आरोपी मात्र मोकाटच आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भेट देऊनही अजूनही तपासात प्रगती झाली नाही. या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पण अजूनही काहीही ठोस कारवाई झाली नाही. या परिसरात विशेषत:हा मुलींमध्ये असुरक्षिततेच वातावरण आहे. या सगळया प्रकाराबाबत इथे कमालीचा असंतोष व्यक्त होतोय.. आज भंडार्‍यात विद्यार्थीनींनी मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला. तर मुंबईतही शुक्रवारी कांदिवली येथे या घटनेचा निषेध करण्यासाठी रिपाईतर्फे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते.

close