मंत्रीमंडळ विस्तार सोमवारी होणार

December 7, 2008 4:54 AM0 commentsViews: 2

7 डिसेंबर, मुंबईराज्यमंत्रीमंडळाचा विस्तार आता सोमवारी 11 वाजता होणार आहे. हा समारंभ शुक्रवारी सकाळीच व्हावा अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची इच्छा होती. मात्र सत्य साईबाबांवर विश्वास असलेल्या अशोक चव्हाण यांनी मुहूर्त पाहूनच मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल अशी भूमिका घेतल्याने, हा कार्यक्रम आता सोमवारी होईल, असं बोललं जात आहे. राष्ट्रवादीतर्फे संभाव्य मंत्री म्हणून छगन भुजबळांसोबत बबनराव पाचपुते, डॉ.विजय गावित, नवाब मलिक यांच्या नावाची शक्यता आहे. तर काँग्रेसतर्फे पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, वसंत पुरके आणि अनिस अहमद यांची नाव घेतली जात आहेत.

close