भंडारा बलात्कार आणि हत्या प्रकरणी 7 नवे संशयित ताब्यात

March 6, 2013 7:41 AM0 commentsViews: 5

06 मार्च

भंडारा जिल्ह्यातल्या मुरमाडी गावात 3 अल्पवयीन बहिणींच्या बलात्कार आणि हत्याप्रकरणी भंडारा पोलिसांनी आज 7 नव्या संशयितांना ताब्यात घेतलं. महत्वाचं म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी आज मुलींची आई आणि आजोबांचीही चौकशी केली आहे. सोमवारी पोलिसांनी या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेतलं होतं, त्यांना चौकशीनंतर सोडून देण्यात आलं होतं. या गुन्ह्याला 20 दिवस उलटून गेलेत मात्र अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

close